Thursday, February 16, 2017

दिवस असे की


दिवस असे की कोणी माझा नाही
अन्‌ मी कोणाचा नाही..

आकाशाच्या छत्रीखाली भिजतो
आयुष्यावर हसणे थुंकून देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही;
या हसणे म्हणवत नाही !..

प्रश्‍नांचे हे एकसंधसे तुकडे
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे
या घोड्याला लगाम शोधत आहे;
परि मजला गवसत नाही..

मी तुसडा की मी भगवा बैरागी ?
मद्यपि वा मी गांजेवाला जोगी ?
अस्तित्वाला हजार नावे देतो;
परि नाव ठेववत नाही..

'मम' म्हणताना आता हसतो थोडे
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे
या जगण्याला स्वप्‍नांचाही आता;
मेघ पालवत नाही..


- संदीप खरे

No comments:

Post a Comment