Friday, September 4, 2015

मैत्री.......

मैत्री.......


मैत्री म्हणजे विश्वासमैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान
मैत्री म्हणजे प्रेम

मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव
मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश
मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा

हळुवार स्पर्श
मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन
मैत्री म्हणजे खेड

मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट
मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा
मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन


मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण
मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण
मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हण्जे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग
मैत्री.............................................







******************************************************
तू. 


तू आलीस माझ्या जीवनात नव पहाट बनूनमी मन दिले तुला हृदय खणून
आठवणीत काढतो सारया राती जागून (ये तो सबको होता है)
गेलीस गावाला की तुझ विना जातो झुरून
दिवस सुरु होतो माझा तुझे नाम स्मरून
तुझा फोटो बघतो (मोबाइल मधला) निघताना घरून
तुझे हसणे, लाजणे तर जाते माझे काळीज चिरून
करत असशील प्रेम तर घे परमिशन बापा कडून
ये माझ्या घरी आणि रहा मिळून मिसळून
दे खूप प्रेम मला आणि घे दुपटीने माझ्या कडून
मानना पडेगा तुझे जेव्हा बसशील रुसून
गेलीस सोडून मला तर जीव जाईल माझा मग काय फायदा रडून
जीवच नसेल शरीरात तर कश्या येतील संवेदना या हृदया मधून................................

खूप बरे वाटते तुझ्या जवळ राहून



!! शाळेतले ते दिवस !!

!! शाळेतले ते दिवस !!


अडगळीच्या खोलीमधलं दप्तर
आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन
बाकांवरती जाऊन बसतं ||


प्रार्थनेचा शब्द अन शब्द
माझ्या कानामध्ये घुमतो |
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||


या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||
रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||

पण या सगळ्या शिदोरीवरंच
बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर
तुमच्यासारखं स्वतःलाच
रागवून बघतो ||


इवल्याश्या या रोपट्याची
तुम्ही इतकी वाढ केली आहे |
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा सवय
आता गेली आहे ||

चांगलं अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही |
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही ||


दोन बोटं संस्कारांचा समास
तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी
रोज माणसं जोडतो आहे ||





योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
हळव्या क्षणांची काही पानं
ठळक अक्षरात गिरवलेली ||


तारखेसह पूर्ण आहे वही |
फक्त एकदा पाहून जा |
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा